प्रतिनिधी गोवन वार्ता पणजी : भारतीय भाषा सुरक्षा मंच तिसवाडीच्यावतीने सोमवारी सायंकाळी पणजीतील हेडगेवार हायस्कूल ते आझाद मैदान अशी मोटारसायकल फेरी काढण्यात आली. यामध्ये मंचचे समारे ५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. या फेरीचा समारोप आझाद मैदान येथे करण्यात आला. त्यानंतर उपस्थित कार्यकरत्यांना मार्गदर्शन करताना उदय शिरोडकर म्हणाले की, सरकारने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिले जाणारे अनुदान बंद करावे आणि कोकणी-मराठीच्या विकासाला प्राधान्य द्यावे. असे न केल्यास मेळावा आयोजित करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. वासुदेव भट यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ११ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मळा येथील हेडगेवार हायस्कूलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. या बैठकीत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला भाषाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
No comments:
Post a Comment